विकासकामात वेळकाढूपणा करू नका : ना.संजय बनसोडे
लातूर : उदगीर व जळकोट तालुक्यातील समस्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत, विकासकामात वेळकाढूपणा करू नका, मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे, तेव्हा हलगर्जीपणा करून विकासात खोडा घालू नका; अशी उदगीर जळकोट विकास आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना समज दिली.
राज्यमंत्री ना.संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली लातूर येथील विश्रामगृहात विविध विभागाच्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघातील जलसंपदा विभागांतर्गत मतदारसंघातील सिंचन तलावाचे प्रस्ताव तयार करणे, उदगीर बस स्थानक नुतनीकरण संबंधित समस्या व अडथळे, प्रलंबित असलेले तिरू नदीवरील बॅरेजस, बांधकाम कामगार कल्याण मंडळ अंतर्गत विविध योजना, उदगीर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या व विविध विकासकामांचा आढावा घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत अनेक विषयांवर चर्चा करून सविस्त आढावा घेवून तातडीने प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी प्रा.श्याम डावळे, पं.स.उपसभापती बाळासाहेब मारलापल्ले यांच्यासह अनेक पदाधिकारी व प्रत्येक विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.