पत्रकारावर हल्ला करणाऱ्या समाजकंटकाविरुद्ध कारवाईची मागणी !
-----------------------------------------------------------------------
उदगीर : जेष्ठ पत्रकार दिलिप डासाळकर (सेलू जि.परभणी) येथील यांच्यावर प्राणघातक हल्ला करणार्या आरोपी विरोधात पत्रकार संरक्षण कलमाखाली गुन्हा दाखल करुन कठोर शिक्षा करावी या मागणीचे निवेदन उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने उपविभागीय अधिकार्यांना देण्यात आले.
सेलु जिल्हा परभणी येथील जेष्ठ पत्रकार दिलीप डासाळकर यांच्यावर तीन ते चार अज्ञात व्यक्तीनी हल्ला करून मारहाण केल्याची घटना दि. १४ रोजी घडली. पत्रकार दिलीप डासाळकर यांनी भ्रष्टाचार आणि गैरकारभाराच्या विरोधात लेखन केल्यामुळे अनेकांवर कारवाई झाली आहे. त्यांनी 'उपजिल्हा रुग्णालयात करोडो रुपयाचा आर्थिक गैरव्यवहार' प्रकरणी लिखाण व आरोग्य अधिकारी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती; अशा अनेक भ्रष्टाचारी अधिकार्यांना विविध प्रकरणात आपल्या लेखणीने समाजासमोर उघडे पाडले असल्याने त्यांच्यावर हा दुसऱ्यांदा प्राणघातक हल्ला झाला असावा अशी शक्यता आहे.
या प्रकरणी पत्रकार संरक्षण कलमाखाली गुन्हा दाखल करावा अशी मागणी उदगीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या निवेदनावर पत्रकार संघाचे अध्यक्ष राम मोतीपवळे, जेष्ठ पत्रकार सुरेश पाटिल नेत्रगावकर, अनंत अपसिंगेकर, एल.पी.उगीले, विनायक चाकुरे, विजय चिल्लरगे, विक्रम हलकीकर,श्रीपाद सिमंतकर, नागेंद्र साबणे, विजय चिल्लरगे, विक्रम हलकीकर,श्रीपाद सिमंतकर, नागेंद्र साबणे, युवराज धोत्रे, वसंत गोखले, रवींद्र हसरगुंडे, माधव रोडगे, सुनिल तांदळे, बबन कांबळे, अंबादास अलमखाने, भगवान सगर, माधव खताळ, रसुल पठाण आदिंच्या सह्या आहेत.