संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे स्नेहसंमेलन संपन्न
उदगीर : येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष राहुलभैय्या केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मुन्ना उर्फ सिध्देश्वर पाटील, पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले ल, उद्योजक बिपीन पाटील, सतिश पाटील, येणकीचे संरपंच ज्ञानेश्वर बिरादार, संजय मामा पाटील, पत्रकार रामभाऊ मोतीपवळे, अमित पाटील, युवराज कांडगिरे, शाळेचे अध्यक्ष गोविंद निटूरे, सचिव वसुंधरा निटूरे, मुख्याध्यापिका जगताप अनिता यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. यावेळी शिक्षकवृंद, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.