बेफिकीर कणिका कपूर ... समाजाचं काय?

बेफिकीर कणिका कपूर ... समाजाचं काय?
------------------------------------- 


काल पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी दि.२२ मार्च रोजी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आणि एकजात मोदी विरोधकांना तो राजकीय स्टंट वाटत आहे. हा राजकीय इवेंट असेल ज्यांना वाटत आहे त्यांनी आजच्या कणिका कपूर या सेलेब्रिटीचा बेफिकीरपणा अभ्यासावा आणि मगच बोलावे. एखाद्या संकटाला पक्ष, धर्म व जात ठाऊक नसते. पंतप्रधान मोदी यांनी काळजी केली, घरीच राहण्याचे आवाहन केले याचा अर्थ ते फक्त आपल्याच कार्यकर्त्याला, फक्त हिंदू व्यक्तींना हा संदेश देत नाहीत तर देशातील १३५ कोटी लोकांची काळजी घेत आहेत. आज देश एका मोठ्या संक्रमणातून जात आहे. राजकारण करायला अनेक विषय आहेत, त्यावर जरूर राजकारण व्हावे, कोणाला काही वाटणार नाही. कोरोना सारख्या जागतिक महामारीत माझ्या धर्माच्या लोकांना काही होत नाही, आम्ही आमचं आंदोलनच मागे घेणार नाही, हा हेकेखोरपणा आहे आणि हा समस्त देशापुढे संकट वाढवत आहे.



ज्यांना कोरोनाचे संकट जाणवत नाही ते एकत्र मूर्ख आहेत किंवा समाजाबद्दल संवेदनशील नाहीत. मोदी द्वेष, भाजपा द्वेष जर जीवापेक्षा मोठा वाटत असेल तर अशा लोकांना समाजात राहण्याचा काहीहि अधिकार नाही. आपल्या हेकाडीपणामुळे सारा समाज वेठीस धरत आहेत. त्याचेच सुधारित रूप कणिका कपूर आहे. आपण परदेशातून आलो आहोत, आपण थोडे सजग राहवे असे वाटले नाही. आपली तपासणी करून घ्यावी वाटली नाही. एका मूर्ख बाईमुळे आज ३ शहरावर संकट घोंगावत आहे, जर या एका सेलेब्रिटी बाईमुळे शेकडोंनी कोरोनाग्रस्त समाजात फिरत असतील तर महामारी काय असते हे आपल्याला लवकरच कळेल. गावच्यागाव बेचिराख होतील.


सर्व समाजाला अजूनही एकच सांगणे आहे, अजून वेळ गेली नाही. पंतप्रधान मोदी पंडित नाहीत, तुमच्या दृष्टीने चायवाला आहेत. तुम्ही फार विद्वान आहात तर थोडी अक्कल वापरा. कारण तुमच्या दृष्टीने मा.मोदी यांना बायको लेकर नाहीत पण तुंम्हाला बायको लेकर आहेत, घर आहे संसार आहे तर किमान काही दिवस बायकोच्या संपर्कात घरीच रहा. फाजील व बालिश बोलण्यात घरच्यांना अडचणीत आणू नका. पंतप्रधान मोदी सांगतात म्हणजे मनानेच काही सांगत नाहीत, किमान त्यांच्या हाताखाली काही लोक काम करत असतील, काही सल्लागार असतील, त्यांना काही कळत असेल. मोदींनी तुमच्या करमणुकीसाठी भाषण केले असे वाटत असेल तर खुशाल कोरोनाकडे दुर्लक्ष करा. कणिका कपूरच्या संपर्कात जेवढे लोक गेले आज त्याची अवस्था केविलवाणी झाली आहे. कदाचित तुमच्या आजूबाजूला एखादी 'कणिका कपूर' असू शकते. सरकार एका मर्यादेपर्यंत परिस्थिती हाताळू शकते, जर बिघडली तर मरणाला सामोरे जाण्यावाचून पर्याय नसेल. जास्ती डोक लाऊ नका, बिनकामी अक्कल वापरू नका. आपल्या बायको लेकरासाठी घरी रहा. मोदी विरोध म्हणून दि.२२ रोजी स्टंट करू नका, अंगलट येईल, कदाचित जीवावर बेतेल. पुनः एकच सांगतो 'किमान मोदी विरोधासाठी तरी किमान जिवंत रहा.'